आजकाल....
गस्त घालते मी
माझ्याच भोवती
आणि तपासते
माझा प्रत्येक श्वास
आत घेतांना
व
बाहेर सोडतांना देखील
आणि
मग मांडत बसते हिशोब
प्राणवायूचा....
आवश्यक
कि
अनावश्यक....
हिशोब चुकतो
नेहमीच
दिल्या घेतल्याची नोंद असली तरी
समीकरण जमत नाहीच कधी
म्हणूनच गस्त.....
पडणाऱ्या प्रत्येक पावलावरही
दिशा सापडत नसली तरी
दिशाहीनतेची जबाबदारी अंगावर घेवून
असंख्य जीवाणू पिंगा घालतात
त्यांना झटकत.....
कधी दुर्लक्ष करीत
आपल्याच शब्दांना धार चढवीत
मर्दांनगीच्या सुरात
चालूच असते गस्त
आपल्याच भोवती...
आपल्याच वरती....
- विशाखासमीर
गस्त घालते मी
माझ्याच भोवती
आणि तपासते
माझा प्रत्येक श्वास
आत घेतांना
व
बाहेर सोडतांना देखील
आणि
मग मांडत बसते हिशोब
प्राणवायूचा....
आवश्यक
कि
अनावश्यक....
हिशोब चुकतो
नेहमीच
दिल्या घेतल्याची नोंद असली तरी
समीकरण जमत नाहीच कधी
म्हणूनच गस्त.....
पडणाऱ्या प्रत्येक पावलावरही
दिशा सापडत नसली तरी
दिशाहीनतेची जबाबदारी अंगावर घेवून
असंख्य जीवाणू पिंगा घालतात
त्यांना झटकत.....
कधी दुर्लक्ष करीत
आपल्याच शब्दांना धार चढवीत
मर्दांनगीच्या सुरात
चालूच असते गस्त
आपल्याच भोवती...
आपल्याच वरती....
- विशाखासमीर