मोबदला..
शब्द न शब्द तूझाही
माझ्यासोबत चालू लागेल
स्वप्नवत सत्य सारे
दारासमोर उभे असेल
गंधाळलेले श्वास असतील
थांबलेले मन असेल
हवे हवे असणारे
बंध सारे बांधले जातील
नको नको म्हटलेले
क्षण फेर धरून नाचतील
तुझ्या - माझ्यावरून तेव्हा
मीठ - मोहऱ्या फिरतील
उंबरा सुद्धा नाचेल बागडेल
उम्बराच्या अलिकडे मी
अवखळ .... अपूर्ण
पलीकडे तू
तसाच स्थितप्रद्न्य !!
माझ्या स्वप्नी स्वर्ग
ओंजंळी चांदणे
तुझ्या माथी गणितं
पुढल्या आयुष्याची....
सोडवितांना गणितं
निसटेल एक एक चांदणी
उतरेल स्वप्न सत्यात
तरीही स्वर्ग असेल आयुष्य
कारण तुझी गणितं सुटत जातील
माझ्या चांदण्याच्या मोबदल्यात......
- विशाखासमीर
माझ्यासोबत चालू लागेल
स्वप्नवत सत्य सारे
दारासमोर उभे असेल
गंधाळलेले श्वास असतील
थांबलेले मन असेल
हवे हवे असणारे
बंध सारे बांधले जातील
नको नको म्हटलेले
क्षण फेर धरून नाचतील
तुझ्या - माझ्यावरून तेव्हा
मीठ - मोहऱ्या फिरतील
उंबरा सुद्धा नाचेल बागडेल
उम्बराच्या अलिकडे मी
अवखळ .... अपूर्ण
पलीकडे तू
तसाच स्थितप्रद्न्य !!
माझ्या स्वप्नी स्वर्ग
ओंजंळी चांदणे
तुझ्या माथी गणितं
पुढल्या आयुष्याची....
सोडवितांना गणितं
निसटेल एक एक चांदणी
उतरेल स्वप्न सत्यात
तरीही स्वर्ग असेल आयुष्य
कारण तुझी गणितं सुटत जातील
माझ्या चांदण्याच्या मोबदल्यात......
- विशाखासमीर
No comments:
Post a Comment