मनमनमंजिरी

मनमनमंजिरी

Monday, August 10, 2015

शिक्का - हक्काचा !!

शिक्का - हक्काचा !!
असंबद्ध संबंधातून प्रसवलेल्या आशा
रुंदावत जातात कक्षा अरुंद जागेतून
नैतिक अनैतिक घोळक्यातून वाट काढत,
असल्या नसल्याची एक एक साक्ष जमा करत
अंधारलेल्या आभासाने काळ्याकुट्ट झालेल्या नजरा
विस्तीर्ण विदीर्णता
धीरोदात्त आशावाद
नियमवलीच्या चक्रव्यूहात धराशायी
भव्य भग्नतेच्या अवशेषात लुप्त आत्मा
धग्धगत्या अग्निकुंडात
शोधत बसतो पवित्र्याच्या खुणा...
फ़क्त एकच इच्छा उराशी
शिक्कामोर्तब...
दिमाखात फिरता यावे म्हणून धडपड
एकाच स्टॅम्पसाठी...
पांढऱ्याशुभ्र कागदावर एकतरी
आपलीशी वाटणारी सही
आणि एकच शिक्का...
हक्काचा!!
- विशाखासमीर

No comments:

Post a Comment