कातडी...
नविन लग्न !! अवघे दोन दिवस झालेले. चारी दिशांनी ओसंडणारे कोडकौतुक !! चुलत सासूबाबाईंच्या भावाचे लग्न... पहिल्यांदाच खेड्यातील लग्नाचा अनुभव.. सकाळपासून पोटात काहीच नाही. नविन सून .... बोलायची उजागिरी नाहीच नाही. लग्न झाल्या झाल्या विहिणीच्या पंक्तीत बसायला मिळतंय तुला... भाग्यवान आहेस.. म्हणून कौतुक.. नवऱ्यामुलीपेक्षा सर्वांना हिच्यातच इंटरेस्ट. कारण नवरी गावातलीच - डॉक्टरची मुलगी.. फेमस. गावात भलतेच गाजलेले प्रेमप्रकरण. वधु जुनीच.... दोन दिवसांनी जरी सिनियर तरी गावातल्या लोकांना ही नवी.. त्यातल्या त्यात शहरातली.. सर्व गोतावळा हिच्याचभोवती...
विहिणीची पंगत सुरु झाली... ज्याला जशी येतील तशी गाणी रेकून झाली.. पोटात भुकेचा गोळा.. पहिला घास घेणार तेव्हढ्यात एका बाईने येवून हात पकडला... जेवायचं नाही... नाव घे आधी.. पुन्हा प्रश्न... लग्न तर दोन दिवसांपूर्वीच झाले... हे सारे सोपस्कार तेव्हाच उरकलेत... आता काय पुन्हा हे ?? घाबरतच प्रश्न टाकला.. पण कोणी ऐकेचना.. आम्ही नव्हतो ग लग्नात... कित्ती गर्दी होती विहिणीच्या पंक्तीत... आम्ही नाही ऐकला हो तुझा उखाणा ... घे पटकन.. ज्युनियर आहेस तू.. ऐकायचे... एक नणंद ओरडली... "आयला raging ??" कासवासारखा स्वभाव पाठीत घालून ही गप्प !! भूकेपोटी जुळवाजुळव करून दोन चार उखाण्यांनी उपस्थित बायकांचे पोट भरले.. आणि हिचे जेवण सुरु झाले...
पहिला घास... भाजी - पोळी... देव आठवले..घास घशात अडकला.. जोरात ठसका... भाजीत तिखट कि तिखटात भाजी ?? कोशिबिरीपासून सर्व जहाल.... डोळे लाललाल. काकुसासू बाजूलाच बसलेल्या.. त्यांना परिस्थिती जाणवली. जेवण(?) झाल्या झाल्या वऱ्हाडी खोलीत नेवून त्यांनी लाडू, चिवडा चकल्या दिल्या ... त्यातल्या त्यात चकल्या कमी तिखट... त्या लाडवासोबत गिळल्या.... अवस्था भयानक ... प्रश्नोत्तराचा तास संपता संपत नव्हता.. शेवटी हिची रवानगी काही मुलींसोबत वाड्यावर... खुणेनेच हिने नवऱ्याला सोबत चल अशी विनवणी केली.... तर त्याच्यासोबत अजून ५-७ मुलेही आलीत... १५ -२० जणांचा घोळका वाड्यावर निघाला....
हिला जरा माणसात आल्यासारखे वाटले..
वाड्यात दोघांना पाळण्यावर बसविले.. आणि समोरचा वाघ दाखविला... ही क्षणभर स्तब्ध.. घाबरून नजर वळविली.. दुसरा वाघ.. एका बाजूला हरणांचा कळप...
"अजब बंगला??" ... नागपूरला आहे.. ही कधीच गेली नाही तिथे .... जिवंत प्राण्यांपेक्षा अशा भुसा भरलेल्या प्राण्यांची जास्त भीती .. तिथे खरे काहीच नसते... कातड्याशिवाय..
थोड्याच वेळात २-3 छोटी मुले वाड्यात धावत आली...

"वरातीची वेळ झाली... पाण्याची, दुधा - दह्याची घंगाळी तयार आहेत न ??"
या प्रश्नावर बरीच धावपळ सुरु झाली.. दिंडीदरवाजाशी तांब्याची लखलखीत ५-६ घंगाळी सजविण्यात आली.. आत चौकात लक्ष्मीपूजनाची तयारी करायला त्यांचे कुलगुरू आले..
घंगाळ्याकडे त्यांनी एक कटाक्ष टाकला.. अक्षतांचे ताट आणि काही पूजेचे सामान ठेवले..
कुणीतरी सजविलेले माप आणून चौकटीवर ठेवले...
"रंडीच्याSSSS...." गुरुजी ओरडले. माझी नजर नुसती भिरभिरत होती..
एक एका प्राण्यावर.. त्यांच्या कातडीवर ... मधून लोम्बून राहिलेल्या भूस्यावर..
ते माप दिंडी दरवाजावरून चौकातील दरवाजावर ठेवण्यात आले..
वरात आली....
भराभर सर्व बायकांना आत घेतले... माणसे दाराबाहेर.. छोटी छोटी मुले आधीच बाजूच्या वाड्यात पिटाळलेली...
नवरा - नवरीचा प्रवेश...
आणि कसलेसे वेदोच्चार... जोर जोरात मंत्र... देवतांना आवाहन... सर्व स्तब्ध !! भयाण शांतता...
आणि..... बघता बघता पाण्याचे घंगाळ नवरीवर उलटे झाले... ती जोरात किंचाळली... अनपेक्षित !! मंत्रोच्चराचा वेग वाढला.... आता दुध - दहि.. पुन्हा पाणी... पाच वेळा... ही घाबरली... बाजूला कोण आहे हे सुद्धा कळत नव्हते.. अडखळत विचारले..
"हा काय प्रकार??"
"शुद्धीकरण.. इंटरकास्ट लग्न"
"काय????"
हिच्यातला कासव गळून पडला. डोळे विस्फारले गेले... आवाज जरा मोठा झाला...
"हे चुकीचे आहे..."
कुठूनतरी गर्दीतून सासूबाई आल्यात... तोपर्यंत एकीने हिचे तोंड दाबून ठेवले...
मागच्या दारातून रवानगी थेट शहरात... सोबत अंग चोरून बसलेला नवरा...
ही गच्च डोळे मिटून.. असंख्य प्रश्नांत गुदमरत... कातडी पांघरलेले प्रश्न....
त्या जनावरांसारखा, त्या हिंस्त्र पशुंसारखा प्रत्येक माणूस कातडी पांघरलेला !!

लग्नाच्या आधीपासून तिचे वाड्यावर येणे जाणे होते... अगदी लहानपणापासून म्हणा न.. डॉक्टरची मुलगी म्हणून हिला आणि हिच्या बहिणींना विशेष मान. या मुली जे म्हणतील तेच खेळ खेळायचे. हि मधली असूनही हिचीच बॉसगिरी पूर्ण ग्रुपवर !! पदवी शिक्षणासाठी हि नागपूरला गेली... म्हणजे शहरातले शिक्षण. पण अभ्यासात मुळीच इंटरेस्ट नाही. एक ब्युटीशियनचा कोर्स करून हि गावात परतली. ब्युटी पार्लर सुरु केले. गावातील पहिली उद्योजिका म्हणून हिचे सत्कार झड़ू लागलेत. प्रतिष्ठित लोकांमधे हिची उठबस वाढली. शहरात जाणे - येणे वाढले... त्यातच विराटची आणि हि वरचेवर शहरात भेटू लागले.... वाड्यातील शेंडेफळ हिच्या प्रेमात पडले...
हिचे वडील डॉक्टर..... त्यामुळे वाड्यावरील दुखणे खुपणे त्यांना चांगलेच ठावूक... प्रत्येकाची नाडी त्या डॉक्टरच्याच हातात.. वाड्यावर indirectly डॉक्टरचा दबदबा. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना जमिनदारीचे डोहाळे... आणि सर्व डोहाळे निस्तरणारा हा डॉक्टर... आज त्याची मुलगीच ह्या घरची सून झाली... सर्वात लहान सून !! वाड्यावरच्या एकुलत्या एका इंजिनियरशी हिचे लग्न बऱ्याच ताणतणावात पक्के झाले... भलेही याने ४ वर्षांचे इंजिनियरिंग १० वर्षात पूर्ण केलेले !!
........ वाड्याचा एक हिस्सा यांना दिला गेला. वाड्याचे पहिले पार्टीशन !!

त्यानंतर जवळपास २ वर्षांनी काकासासरे वारलेत म्हणून गावी आलो. भोवताल पुन्हा लग्नातला गोतावळा. यावेळेस आमच्या वाड्यावर !! या गोतावळ्यात एकच मॉडर्न आणि पॉश बाई.... बॉबकट, सिफोनची साडी, गळ्यात छोटेसे मंगळसुत्र, हातात एक एकच कडे. (तेव्हा सासरी जायचे म्हणजे गळ्यात मोठे मंगलसूत्र, एखादा लहान, एखादा मोठा दागिना, हातभर बांगड्या घालाव्या लागत.. सोबत पाटल्या तोडेहि) एकदम टकाटक बाई.. उंची -रुंदी सारे काही डोळ्यात भरणारे.... हि छोटीमामी... तू आली होतीस ना हिच्या लग्नात ?? मी flat ... अगदी ती मामी वाड्याबाहेर निघेपर्यंत तिच्याकडे एकटक बघत बसली..
तिची पाठ फिरल्याबरोबर बायकांच्या बोलण्याला ऊत आले. दोन वर्षात ह्या बयेने रंग दाखविले बघ. एक एक करून वाड्यातील सर्व महागडे सामान सोयीस्कर आपल्या घरात वळविले. आपल्याच शेतीने हिचे माहेरच काय तर, बहिणींची घरेही भरते. आम्हाला तर अजून पसाभर धान्य माहेरी न्यायची उजागिरी नाही. तातेजींवर काय जादू केली कुणास ठावूक. दर २-3 महिन्याकाठी तोळा तोळा सोने नेते. सर्वांसारखेच तिच्या अंगावरही दागिने घातलेत. पण ते सारे लॉकर मध्ये टाकून थुतूर - मुतूर दागिने घालून फिरत असते गावभर... महिन्याला नवा दागिना.. ना सासूचा मान ना नणंदा - जावांचा.. काय जादू केली पुरुषा - मुलांवर देव जाणे... दिवस रात्र सारे हिच्याच तालावर नाचतात.. संत्राची पहिली टोपली हिच्याकडे... इथे कधी आपल्या मुलांना सांभाळले नसेल पण तिकडे जावून तिच्या मुलाची लंगोटी - दुपटे बदलवतात.. तिला काही साधेपणाने म्हटले तरी गुर्रावते.. आणि तिचा आवाज वाढला कि सर्व तिच्याच बाजूने... आम्ही दुर्लक्षित !!
बायकांच्या या गोष्टीने हिला कन्फ्युज्ड केले...मामीला खूप सासुरवास वैगरे होत असेल अशी हिची कल्पना पार धुवून निघाली. पहिलेपासून कल्पना असली तरी मामीच्या डोळ्यासमोरून "शुद्धिकरण" बाजूला झाले नसेल कदाचित !!... आणि हि banded क्वीन झाली.... टेरर सुना, खाष्ट सासवा - नणंदा ह्यांना ही पुरून उरली.... नव्हे सर्वांची पळता भुई थोडी केली.. घर - घरपण घाऊक झाले... सर्व प्राण्यांचे कातडे चिरल्या गेले नि भुसा बाहेर आला..

- विशाखासमीर
No comments:
Post a Comment