लाडबझार - चारमिनार
झुण झुणक झुणक झुण झुंना
झुण झुणक झुणक झुण झुंना
आट्टूश पान बाई आट्टूश
गोठ तोडे घालून आपण नट्टूश !!
इतिहासाच्या तिजोरीत बंद झालेलं हे गाणं “रमा – माधव” च्या निमित्त्याने पुन्हा उघडलं गेलं आणि सूर नव्याने जुळू लागलेत हातातल्या कांकणासोबत!! कांकण, बांगड्या, चुडी... जिव्हाळा प्रसविणारा निर्जीव जीव. लहानपणी हातभर बांगड्या घालून नाचणारा आपला हात. प्रत्येकाला त्या दिसाव्या, आपलं कौतुक व्हावं म्हणून सतत खळखळत मागण्या पूर्ण करून घेणारे बालपण कधी सरतं हे कळतं न कळतं तेच हिरव्या चुड्याच्या हिरव्यागार वयात मन ओथंबू लागतं.
"छनन छन चुडिया खनक गयी देख साहिबा...
चुडिया खनक गयी हाथ मा.. मोरनी बागा मा बोले आज रातमा ..."
या गाण्याचा जौहार सुरु होतो. आणि कुठल्याशा अनामिक क्षणी परिकथेतिल राजकुमार अलगद हातात बांगड्या चढवत म्हणतो...
"चूड़ी नही मेरा दिल है... देखो देखो टूटे ना.."
तारुण्यानं मुसमुसलेल्या मनाला सख्यांची कुजबुज जाणवू लागते...
"किन किन काकण, रूण झुण पैजण सजली नटली नवरी आली..
गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली ग पोरी नवरी आली"
येथुनच सुरु होते हिरव्या - लाल चुड्याची खळखळ... नैसर्गिक नात्यांची गुंफण...
बोले चुड़िया बोले कंगना
हाय में हो गयी तेरी साजना...
.............हाय!!! ये चुड़िया माफ करा या बांगड्या आमचा विक पॉइंट म्हणून ऐटीत किणकिणतो!!
"चूड़ी नही मेरा दिल है... देखो देखो टूटे ना.."
तारुण्यानं मुसमुसलेल्या मनाला सख्यांची कुजबुज जाणवू लागते...
"किन किन काकण, रूण झुण पैजण सजली नटली नवरी आली..
गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली ग पोरी नवरी आली"
येथुनच सुरु होते हिरव्या - लाल चुड्याची खळखळ... नैसर्गिक नात्यांची गुंफण...
बोले चुड़िया बोले कंगना
हाय में हो गयी तेरी साजना...
.............हाय!!! ये चुड़िया माफ करा या बांगड्या आमचा विक पॉइंट म्हणून ऐटीत किणकिणतो!!
या किणकिण हौसेला जर खरेच पूर्णत्व द्यायचे असेल तर हैदराबादच्या “चुडी बाजारात” एकदा याच. चारमिनारच्या कुशीत विसावलेल्या या बाजाराला ऐतिहासिक गंध. त्याच कुतुबशाही, निझामशाही गंधातून सजलेला चमचम बाजार. याचे अजून एक नाव “लाड बाजार”. लाड म्हणजेच लाख. इथल्या बांगड्यांचे विशिष्ट्य म्हणजे लाखेवर कोरीव कातीव नक्षीकाम. आकर्षक रंग, कृत्रिम खडे, कुंदन, मोती आणि मिनाकारी याचा सुंदर अविष्कार. हवा तो रंग, हवा तो साईज, हवी ती रंगसंगती !! जवळपास एक लाखाहून अधिक व्हेरायटीत दिमाखात चालणारा एक किलोमीटरचा विस्तार असलेला हा झगझगीत रस्ता... रस्ता?? म्हणजे माणसांखाली रस्ता कि रस्त्यावर माणसे हा प्रश्नच!! त्या रस्तातून डाव्या – उजव्या बाजूला १०-१० फुटांवर अनेक गल्ल्या. ९०% बांगड्याच!! बुरख्यांच्या गर्दीतून वाट काढीत घुसायचे , हो अक्षरश: घुसायचेच कारण जायचे हा शब्दप्रयोग निदान या भागास तरी लागू होत नाही. पहिल्यांदा गेल्यास क्षणभर “मिनी पाकिस्तान” मध्ये आल्याचाच भास होतो. चौफेर बुरखाधारी आणि क्रोशाची गोल टोपी घालणारी गर्दी!! देशी विदेशी पर्यटकांची तामझाम!! गेल्या गेल्या दुकानदार पर्यटक आणि स्थानिक लगेच हेरतो. नेहमीचे गिऱ्हाईक आणि पर्यटक यांत सुरक्षित अंतर राखले जाईल याची जबाबदारी घेतली जाते.
“हमेशा के है ना भैया, बराबर बोलो”
“समज में आये सो चुडी इतनी महेंगी ??” पहिले वाक्य नाही पण दुसरे त्याला खात्री देवून जाते गिऱ्हाईक हैद्रबादचाच!!
खरेदी करता करता मधेच घरून किंवा कोणा मराठी व्यक्तीचा फोन येतो आपण मराठीत बोलतो. बाजूला असणारे मराठी पर्यटक कान लावून ऐकतात. फोन संपल्या संपल्या पटकन विचारतात,
“हे घेतेय/घेतोय, इतका भाव म्हणतोय, बरोबर का??”
बाजार जरी बांगड्यांचा असला तरी मराठी माणूस येथे मोती/खडे खरीदतांनाच दिसतात. कदाचित त्या लाखेच्या बांगड्यावरील बटबटीट नक्षीकाम आणि त्याची घसघशीत किंमत आपल्याला थोडे विचारात टाकते. पण एकदा हैद्राबादच्या कल्चर मध्ये वावरले कि त्या बांगड्यावर आपोआप प्रेम जडते आणि ती किंमतहि ठीक वाटते. तशा या “चुडी बाजारात” अगदी १० रुपयांपासून ते १,००,००० पर्यंत वाईड रेंज आहे बांगड्याची !! आपल्या बांगड्यांच्या डब्ब्याला जरा या बांगड्याची जोड द्या... राजेशाही फील येईल!! हौसेला मोल नाही असे म्हणतात तेच खरे !!
चुडीया खनकी, खनकानेवाले आ गये... !!

No comments:
Post a Comment