"हि" ची गोष्ट
“आज दुपारी सारे
सिनेमाला जातील.... तुझी आई, दादा, आणि
लहान बहिण. माझा लहान भाऊ आणि वहिनी. तू राहशील घरी माझ्यासोबत ?? १२वीत ४-५ वेळा नापास झालेला दत्ताकाका या चिमुरडीला बोलला. ही पटकन “हो”
म्हणाली. आवडायचा हिला त्याचा स्पर्श. हिचा फ्रॉक काढून सर्वांगावर फिरणारे त्याचे
ओठ... करकचून हिला कुरवाळणे. हिच्या अंगावरून फिरणारं त्याचं शरीर... त्याच्या
अंगावर हिचं हुंदडणं सारं सारं तिला या वयातही हुरळवून टाकायचं.
आईनं कुठल्या वयात सांगायचं
असतं आपल्या छकुलीला हे सारं?? लैंगिक शिक्षण –
लैंगिक शिक्षण म्हणतात ते कधीपासून द्यायचं ?? “अ” “आ” “ई”
शिकवायच्या आधीच ?? कि लेक गर्भात असतांनाच हे पाठ घ्यायचे
असतात ??
इयत्ता पहिली ते तिसरी अशी
तीन वर्षे हा दत्ता असाच खेळत होता तिच्याशी... आणि तिलाही खेळवत होता...
घरी आई, आज्जी.... पण कुणालाही कसलीही भनक नाही. या सर्व प्रकारात पकडले गेलो
किंवा नाही गेलो तरी हिचे काय होईल ??? हिलाही कल्पना नाही.
आता हि काही अगदीच लहान राहिली
नव्हती. मैत्रिणींच्या गप्पा
ऐकून प्रेमा – बिमाबद्दल हिला कळू लागले होते. ५-६ वीत सर्वांनाच कळते तसेच..
तरीही तिच्या आणि बाळूच्या प्रकरणाला प्रेमाचे वैगरे नाव नाही द्यावेसे वाटले तिला
कधीच.. पण हे काहीतरी “वाईट” आहे हि भावना हळू हळू तिच्या मनात घर करू लागली....
आणि ती बाळूला टाळू लागली... तरी तो कुठूनसा स्पर्श करायचा आणि हि झोकून द्यायची..
मधेच खुट्ट झाले कि भेदरायची.
ही सातवीत आली ...वडिलांची
पुन्हा बदली.. नवीन गाव... मोठ्ठ शहर..इथे कोणीच कुणाला ओळखत नाही. कुणीच कुणाच्या
अधे मध्ये नाही. कुणीच कुणाला कोपऱ्यात खिचत नाही किंवा पलंगावर झोपवून दाराची कडी
लावत नाही. हिला हे मनोमन आवडले..... फार छान वाटले.. त्या आवडणाऱ्या
स्पर्शापेक्षाही छान.... एक मोकळा श्वास घेवू शकतोय या समाधानाने ती बागडू लागली..
फुलू लागली... बुद्धीने, सौंदर्याने, व्यक्तिमत्वाने..... हिने आता मनाशी एक
खुणगाठ बांधली. मागचं सारं विसरायचं. पण त्या चित्र विचित्र आठवणी पिच्छा सोडेनात.
सकाळी हि पेपर वाचत
बसलेली... अचानक लक्ष एका
बातमीवर..... कोर्टाचा निर्णय... “अठरा वर्षाखालील मुलीवर तिच्या इच्छेने जरी
शाररीक संबंध प्रस्थापित केलेत तरी तो बलात्कार असतो.”
ब – ला – त्का –
र......नुसत्या शब्दांनीच हि हादरली. ... म्हणजे...म्हणजे.... आजपर्यंत मी ज्या
गोष्टीला माझा गुन्हा मानत होती इतकी वर्षे ज्या ओझ्याखाली जगत होती.... तो गुन्हा
किंवा फसवणूक नव्हतीच... तर तो होता बलात्कार... सतत सहा वर्षे माझ्यावर बलात्कार
होत होता... डोके गरगरायला लागले.... हिने दोन हातात ते गच्च धरले... मान गुढघ्यात
घातली आणि हिच्या मनाने आक्रोश केला.... अजून कोण कोण आणि किती चिमुकल्या असतील माझ्यासारख्या...
ज्यांच्यावर वर्षानुवर्षे असले बलात्कार होत असतील... कसे थांबवणार आपण हे सर्व ??? शिक्षण, कायदे, कि संस्कार????
No comments:
Post a Comment