14 - 15 ऑगस्ट 2012 आणि चंचलगुडा जेल...
सकाळ पासून वेध... अस्पष्ट दृष्टिपथ.. आजपर्यंत जेल फ़क्त सिनेमातच बघितली प्रत्यक्षात नाही...बाकी बायकांसारखा असा काही माझा अनुभव नव्हता. वयाच्या 18 व्या वर्षी नागपुरची कारसेवक म्हणून चांगला 10 दिवसांचा उत्तर प्रदेश सरकारचा पाहुणचार नैनीत घेतला होता....
पण आजची जेलवारी काही वेगळी होती. कारागृहातिल महिलांकरता कार्यक्रम.
"Mam, you have to come as a chief guest" आग्रहाचे बोलावणे.. खरे तर अशा ठिकाणी जायला मला आग्रह मुळीच लागत नाही.. उलट लाळ टपकवत मी ओर्गनायज़रर्सच्या आधीच पोचलेली असते. इथेही तसेच झाले. एखाद्या समारंभाला आल्यासारख्या सर्व मारवाडीणी एक तास उशीरा उगवल्या. आणि कार्यक्रमाआधी काही थ्रिलिंग मिळतं का म्हणून मी एक तास लवकर.. मोबाईल, कैमरा, पर्स सारे काही सेक्युरिटीच्या स्वाधीन करून मला जेलरच्या रूममधे बसविले. जेलर खाली कार्यक्रमाच्या तयारीत... चौतर्फा लटकणारे फोटो आणि मधे मी... रिमांडवर असल्याचा भास. सफोकेशन !!
तब्बल दोन तास जेलरच्या प्रशस्त खोलीतील गुदमर सहन करून आम्ही खाली उतरलो. जेलर आणि वार्डनने गुलाबाच्या फुलाने केलेले स्वागत त्यानंतरचे ओळख - पाळखवाले सोपस्कार.. फॉर्मल कार्यक्रम उरकला भलामोठा स्टेज आणि समोर 50 फुटावर 200 महिला कैदी... आता स्टेज आमच्या स्वाधीन करून पोलिस तुकड़ी समोर खुर्च्यांवर जावून बसली.. देशभक्तिपर गीतांचा पावूस पडू लागला. काही वेळाने माईक माझ्या हाती आला..
जेलरला विनंती केली... त्यांच्यात जावून कार्यक्रम करू ??
ती म्हणाली .. ते कैदी आहेत .. सोल्जर्स नाहित..
काय हरकत आहे?? या माईकशिवाय माझ्या हातात काहीच नाही...
रिस्क आहे..
आवडेल मला..
ठीक आहे...
तिच्या या दोन शब्दावर स्टेजवरुन उडीच मारली.. सुरवातीला त्या बायका थोडया अनकम्फर्ट होत्या.... थोड्याच वेळात सर्वांनी धुमाकुळ घातला...नंतर खंडीभर गप्पा... त्यांनी बनविलेल्या वस्तूंचे शॉपिंग... नाश्ता... Heaven.. 2-3 तास का होईना सर्वांना स्वतंत्र झाल्यासारखे वाटले.. स्वातंत्र्यदिनाची पूर्वसंध्या न मागितलेले दान ओटित घालून विसावली....
'दुसर्या दिवशीपण या' असा आग्रह.. गेल्या गेल्याच ascorting ला जेलर वार्डन ची जोडगोळी. सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून कारागृहाचे ध्वजारोहण झाले... पंतप्रधान झाल्याचा फील... त्याआधी आणि नंतर बरेच झेंडे फडकविले... पण 2012 चा 15 ऑगस्ट .. हातातून उरात साठलाय...
फीलिंग.. जन्मोजन्मीचे पूण्य.

No comments:
Post a Comment